आदिवासी शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची 2 मार्च ला सभा

■ देवरी येथील माँ धुकेश्वरी माता मंदिरच्या सभागृहात सभेचे आयोजन

देवरी: एकात्मिक आदिवासी विकास विभाग येथील शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटना प्रकल्प देवरी व भंडारा कार्यालतातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सभा येत्या बुधवारी(ता.२ मार्च) रोजी दुपारी १२.३० वाजता देवरी येथील माँ धुकेश्वरी माता मंदिराच्या सभागृहात विविध विषयाच्या आधारे आयोजित केली आहे.
ही सभा आदिवासी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे गोंदिया व भंडारा जिल्हाध्यक्ष जे.के.तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करने, नवीन सभासदांची नोंदणी करने, सभासद फी जमा करने बाबद सभासदांच्या वैयक्तिक अडचणी बाबत चर्चा, या सभेत आपल्या अडचणी लेखी स्वरुपात सादर करने, सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांची ओळखपत्र तैयार करण्याची कार्यवाही करण्याबाबत चर्चा आणि नवीन कार्यकारणी तैयार करने. तसेच अध्यक्षांच्या परवानगी ने वेळेवर येणारे इतर विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तरी या सभेत प्रकल्प देवरी व भंडारा येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष जे.के.तिवारी यांनी केले आहे.

Share