कचारगड यात्रेकरांचा सर्व सोईसुविधेची आमदार कोरोटे यांच्याकडून पाहणी

सालेकसा १६: आदिवासी समाजाचे दैवत पारिकुपार लिंगो, माँ कली कंकाली पेनठाणा देवस्थान कचारगड(धनेगाव) येथील देवजत्रेला सोमवार( ता.१४ फेब्रूवारी) पासून सुरुवात झालेली असून या निमित्य आयोजित गोंड़वाना महागोगावा महाअधिवेशन किया पुनेम या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे हे प्रामुख्याने उपस्थित राहून पुजा अर्चना केली व देवस्थान समितीच्या पदधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी दर्शनाकरिता येणाऱ्या यात्रेकरी भाविकांच्या सोई सुविधे बाबद पाहणी केली आणि येथे लागणाऱ्या सर्व व्यवस्थेकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व यात्रेकरी भाविकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझी सैनिक गोंदिया जिल्हाध्यक्ष तेजराम भलावी हे होते. या प्रसंगी सालेकसा तालुका काँग्रेस चे अध्यक्ष वासुदेव चुटे, शहर अध्यक्ष निर्दोष साखरे, नवनिर्वाचित जि.प. सदस्य गीताताई लिल्हारे, विमलताई कटरे, पं.स.सदस्य संगीता राऊत, माजी पं.स.सदस्य कैलास अग्रवाल,लालदास दसरिया, युवक काँग्रेसचे देवरी तालुकाध्यक्ष शकील कुरैशी, गुनाराम मेहेर, यांच्या सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व देवस्थान समितीचे पदाधिकरी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Share