देवरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष संजू उईके तर उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार

◾️राष्ट्रवादीच्या भाजपला समर्थनामुळे देवरीच्या राजकारणात मिष्ट्री

प्रा. डॉ. सुजित टेटे | प्रहार टाईम्स
देवरी 16:
नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये देवरी नगरपंचायतीवर भाजपने आपला कमळ फुलवून स्पष्ट बहुमत मिळविला होता. त्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष पक्का होता. भाजप चे 11 उमेदवार , काँग्रेस चे 4 उमेदवार आणि राष्ट्रवादीचे 2 उमदेवार सदर निवडणुकीमध्ये निवडून आले. आज अखेर संजू उईके यांना नगराध्यक्ष आणि प्रज्ञा संगीडवार यांना उपाध्यक्षाची माळ घालून भाजपने आपला विजयजल्लोष साजरा केला.

नगरपंचायत आणि जिप च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना तिकीट देऊन निवडणूक लढविली परंतु एकही पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना घड्याळात चाबी भरता आली नाही त्यामुळे त्यांचा दणदणीत पराभव झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेहमीच निकटचे मित्र पक्ष समजले जातात त्यामुळे राज्यात देखील महाविकास आघाडीचे सरकार आहे. परंतु देवरी मध्ये स्पष्ट बहुमत असलेल्या भाजप पक्षाला राष्ट्रवादी पक्षश्रेष्टी व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपला पाठिंबा दिल्यामुळे समर्थनामागील मिश्ट्रीची देवरीत चर्चा सुरु आहे. यामागे राष्ट्रवादीचा हेतू काय ? असा सवाल उपस्थित होतो.

दुसरीकडे काँग्रेस चे 4 उमेदवार आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ बघावयास मिळाले असून देवरीच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादीची निकटता बघून काँग्रेस ला देखील धक्का बसलेला आहे हे निश्चितच! राष्ट्रवादीचे वाहत्या पाण्यात हात धुण्यामागिल मनसुबे काय आहेत हे मात्र लवकरच समोर येऊ शकते?

देवरीच्या राजकारणात नवीन चेहरे बघून कुठे उत्साह तर कुठे निराशा हाती लागल्याचे देखील वृत्त आहे. नवीन चेहरे आपली भूमिका कशी बजावतात आणि विकास कार्यास कशी देतात याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. परंतु येणाऱ्या काळात राजकारणातील मिष्ट्री सर्वासमोर येणार हे मात्र निश्चित !

Print Friendly, PDF & Email
Share