ACB: एकाच दिवशी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन सापळे, तलाठी व कारकून अडकले

गोंदिया 15: गोंदिया जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन यशस्वी सापळ्यात गोंदिया येथील भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयात गोंदियाचे कनिष्ठ लिपिक व तिरोडा तहसील कार्यालया अंतर्गत धांदरी तलाठी यांचेवर यशस्वीरित्या सापळ्यातून लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्या वरून संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात खळबळ माजली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी देवरी येथील 41 वर्षिय तक्रारदाराचे तक्रारीवरून हरिदास भवरजार हायस्कूल गणखैरा येथील कर्मचारी सुरेंद्र हिरालाल वाकडे 42 वर्ष यांची सेवा सध्या अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय गोंदिया येथे संलग्न असताना तक्रारदार यास नव्याने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना चे खाते सुरू करण्याकरता 3000 हजार रुपयाची लाचेची मागणी केल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे याची पडताळणी करून दिनांक 15 रोजी 2000 हजार रुपयांची लाच स्वीकारताना यशस्वीरित्या सापळ्यात अडकले. दुसरे कार्यवाहीत तिरोडा तहसील कार्यालया अंतर्गत धादरी येथील तलाठी कार्यालयाच्या महिला तलाठी बालकेश्वरी देवीलाल पटले 43 वर्षे राहणार तिरोडा यांनी सरांडी येथील तक्रार करतेस त्याचे वडिलांची नावे असलेल्या उंमरी येथील शेतीचे 7/12 वर क्षेत्रफळ दुरुस्ती करणे करिता 1350 रुपयांची मागणी करून ही लाच स्वीकारताना अटक करून तिरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून कार्यवाही करण्यात आली असून ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनात मधुकर गीते अप्पर पोलीस अधीक्षक, पुरुषोत्तम अहेरकर पोलीस उप अधीक्षक गोंदिया, अतुल तवाडे पोलीस निरीक्षक गोंदिया, सहाय्यक फौजदार विजय खोबरागडे, नायक पोलीस शिपाई राजेंद्र बिसेन, संतोष शेंडे, महिला पोलीस शिपाई रोहिणी डांगे यांचे पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली

Share