देवरी 15: हसतमुख , उच्चशिक्षित इंजि. प्रीती नेताम यांचा आज वयाच्या 30 व्या वर्षी गोंदिया येथे निधन झाल्याची बातमी समोर येताच देवरी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
प्रीती नेताम नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 च्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. शिवसेना देवरी तालुका उपसंघटिका म्हणून आपली राजकीय भूमिका पार पडली होती.
शैक्षणिक , सामाजिक आणि राजकारणात उत्तम नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने धक्का बसला आहे. प्रीती नेताम यांचा मागे 4 वर्षाची मुलगी शौरवी , पती सचिन भांडारकर असा छोटा परिवार आहे. देवरीवासियांना विश्वास न बसणारी घटना मन हेलावून गेली आहे.








