कुरखेडा नगरपंचायत मध्ये शिवसेना-काँग्रेस ची सत्ता स्थापन
गडचिरोली : जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवड दोन टप्यात होणार होती. आज पहिल्या टप्यातील निवड पार पडली. यात कुरखेडा नगरपंचायतीवर शिवसेना-काँग्रेस ची सत्ता स्थापन झाली असून नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अनिता बोरकर यांची निवड करण्यात आली आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हा समन्वयक किरण पांडव, जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या योग्य मार्गदर्शनात सत्ता स्थापन केली असून शिवसैनीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाली आहे.
कुरखेडा नगरपंचायतीवर भाजपचे 9, शिवेसना 5 तर काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या नगरसेविका जयश्री रासेकर यांनी बंडखोरी करत शिवसेना-काँग्रेसच्या गोठ्यात प्रवेश केला.
त्यामुळे शिवसनेना-काँग्रेस युती संख्येत भर पडली आणि शिवसेना आणि काँग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. व शिवसेनेच्या नगरसेविकेची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख किरण पांडव यांची कौतुक होत आहे .