जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये देवरी तालुक्यातील विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ

देवरी 14: ग्रामपंचायत फुक्कीमेटा (देवरी) कडून नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये देवरी तालुक्यातील विजयी झालेल्यांचा सत्कार समारंभ माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.जनतेच्या समस्या आस्थेने सोडवून आपल्या भागाचा सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे असे मनोगत व्यक्त केले.

सत्कार मूर्ती जिप सदस्य:
सौ सविता ताई संजयजी पूराम
सौ कल्पना नितेशकुमार वालोदे
पंचायत समिती सदस्य:
श्री अनिलजी दसाराम बिसेन
सौ शामकलाताई विट्ठल गावड
सौ अंबिकाताई बंजार
श्री शालिकजी गुरनुले
सौ ममता अंबादे
सौ वैशाली पंधरे
श्री मनोज बोपचे

याप्रंसगी माजी आमदार श्री.संजय पुराम,संघटन महामंत्री श्री.बाळाभाऊ अंजनकर,श्री.प्रमोद सांगीडवार,तालुका महामंत्री श्री.प्रवीण दहीकर,श्री.सुखचंद राऊत,श्री.हुकरेजी,फुक्कीमेटाचे संरपच शिवदर्शन भेंडारकर,उपसरपंच देवेंद्रकुमार हिरवानी यांच्यासह नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Share