नाशिकमध्ये रस्त्यावर वाईन ओतून भाजप महिला आघाडीचे आंदोलन

नाशिक : महाराष्ट्रात ठिकठिकाणी किराणा दुकानात वाईन विक्रिच्या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. नाशिकमध्ये आज या निर्णयाविरोधात भाजप महिला आघाडीकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या भाजप महिला आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाईनची बाटली रस्त्यावर ओतत या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

यावेळी ठाकरे सरकार विरोधात, ठाकरे सरकार हाय हाय, सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा करण्यात आल्या. प्रसंगी आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या. हिरे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर वाईन ओतून त्या वाईनवर नाचत घोषणाबाजी केली. दरम्यान, भाजप महिला आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर आमदार देवयानी फरांदे शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे यांच्या सह्या आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें