इच्छुक उमेदवार लागले कामाला…..
डॉ सुजीत टेटे
देवरी 18:-
सध्या जिल्हा परिषद,पंचायतसमीती निवडणूक अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. मात्र, इच्छुक उमेदवारांना आतापासूनच या निवडणुकीचे वेध लागलेले दिसत आहे .
जिल्हा परिषद – पंचायत समीती निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. मात्र, इच्छुक उमेदवारांचा खर्च मात्र सुरू झाल्याची चर्चा ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जेवणावळी सुरू असतानाच धाब्यांवरही वर्दळ वाढत आहे. विविध सामाजिक कार्यक्रमांबरोबरच प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन वैयक्तिक चर्चा करून मत आजमावले जात आहे.
यंदा देवरी तालुक्यातिल राखिव जागेनुसार जिल्हा परिषद – पंचायत समीतीचे निवडणूक होणार आहे. मतदारांची वाढलेली संख्या त्याचबरोबर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असलेले क्षेत्र ‘कव्हर’ करताना इच्छुक उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन इच्छुक उमेदवारांनी आधीपासूनच कामाला सुरुवात केली आहे असे दृश्य बघावयास मिळतआहे.
क्षेत्रातील कार्यकर्ते आपल्या ‘रेंज’मध्ये आणण्यासाठी खर्च तर करावाच लागणार, अशी आशा ठेऊन काम केले जात आहे.
नेत्यांचे विशेष लक्ष विधानसभा निवडनुकीनंतर या निवडणुकीला राहणार ही शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे तालुक्यातील सर्वच मोठे नेते ‘आपला माणूस’ जिल्हा परिषद – पंचायत समीतीत निवडून जावा, यासाठी विशेष प्रयत्नशील असणार आहेत. क्षेत्रानुसार आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी सुरक्षित क्षेत्राचा शोध सुरू केला आहे. वेगवेगळ्या मार्गाने उमेदवारां कडुन आपल्या निवडक क्षेत्राची चाचपणी केली जात आहे.