माहिती देण्यास टाळाटाळ भोवली; वाशिमच्या आगार व्यवस्थापकास प्रत्येकी २५ हजारांचा दंड!

वाशिमच्या तत्कालीन आगार व्यवस्थापक आर . ए . मोरे व विद्यमान आगार व्यवस्थापक विनोद इलामे यांना 25000/- दंड आकारण्यात आला आहे.

२०१६ पासून माहिती देण्यास टाळाटाळ

देवरी 6: माहिती अधिकार कायद्याच्या चौकटीत राहून मानव विकास योजनेअंतर्गत निळ्या स्कुल बसेसना जिल्हा बाहेर चालविलेल्या संदर्भात नरेश कुमार स्वरुपचंद जैन यांनी मागितलेली माहिती देण्यास अक्षम्य टाळाटाळ करणाऱ्या आगार व्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळ वाशिम कार्यालयातील तत्कालीन व विद्यमान अशा दोन मातब्बर आगार व्यवस्थापकांना राज्य माहिती आयोगाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

वाशिमच्यामागील आगार परिवहन कार्यालयात मागील काळात कार्यरत असलेले आगार व्यवस्थापक आर . ए . मोरे व विद्यमान आगार व्यवस्थापक विनोद इलामे यांना हा दंड आकारण्यात आला आहे. या दोघांच्या मासिक वेतनातून हा दंड वसूल करावा, असेही राज्य माहिती आयुक्त, अमरावती खंडपीठ यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

देवरीचे नरेशकुमार स्वरुपचंद जैन हे मानव विकास योजनेअंतर्गत राज्यात चालणाऱ्या निळ्या स्कुल बसेसचे परिवहन योग्य होते किंवा नाही याचा दाट संशय नरेश कुमार स्वरुपचंद जैन यांना आला होता. यामुळे त्यांनी आगार व्यवस्थापक वाशिम कार्यालयाकडून ११ एप्रिल २०१६ ला मागितली होती. मात्र सतत आगार व्यवस्थापक कार्यालयाकडून टाळाटाळ करण्यात येत होती. तसेच याबाबत जैन यांनी विभागिय नियंत्रक राज्य परिवहन अकोला येथे प्रथम अपिलही दाखल केली होती.

दरम्यान, पहिल्या अर्जाला उत्तर न मिळाल्याने जैन यांनी दुसऱ्यांदा अपील अर्ज दाखल केला, मात्र या दोन्ही अर्जाच्या सुनावणीच्या वेळी जनमाहिती अधिकाऱ्यानी माहिती देण्यास टाळाटाळ केली. माहिती हि व्ययक्तिक स्वरूपाची असल्यामुळे सदर माहिती त्रयस्त व्यक्तिस देता येणार नाही. व अपिल निकाली काढले होते.

माहिती आयोग अमरावतीच्या सुनावणीस विद्यमान जनमाहिती अधिकारी अंतिम सुनावणीसाठी गैरहजर राहिले. तत्कालीन आगार व्यवस्थापक व प्रथम अपिलीय अधिकारी हे हजर होते. व आॅनलाईन सुनावणीत अखेर माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ७ (१) चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत या अधिकाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला. व माहिती प्रदान करण्याचे आदेशही देण्यात आले.

Share