कुछ करते दिखे बाबू-सोना, तो तोड देंगे शरीर का कोना-कोना; प्रेमीयुगुलांना शिवसेनेचा इशारा

भोपाळ 13 : फेब्रुवारी महिना हा प्रेम व्यक्त करणाऱ्यांसाठी उत्सवाचा महिनाच मानला जातो. प्रेमीयुगुले 14 फेब्रुवारी अर्थातच व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसतात. मात्र व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या प्रेमी युगुलांना शिवसेनेने थेट इशाराच दिला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये प्रेमीयुगुलांना रोखण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.

भोपाळमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी भोपाळ शहरातील कालिका शक्ति पीठ मंदिरात लाठ्या काठ्यांची पूजा केली. इतकेच नव्हे तर, ‘भारतीय संस्कृती के सम्मान में, शिवसेना मैदान में’,“पार्क में कुछ करते दिखे बाबू-सोना, तो तोड देंगे शरीर का कोना-कोना”, अशी घोषणाबाजी करुन प्रेमीयुगुलांना इशारा दिला आहे. व्हॅलेंटाईन डे हा पाश्चात्य संस्कृतीचा भाग असल्याने आपला याला विरोध असल्याचं सांगत या कार्यकर्त्यांनी प्रेमीयुगुंलांना इशारा दिला आहे.

Share