एसीबी- लाचखोरांना आवळण्यासाठी एसीबी सज्ज
◾️लाच स्वीकारण्यात ग्रामविकास विभाग, पोलिस विभाग, महसूल विभाग , कृषि विभाग , RTO विभाग अव्वल
गोंदिया 09- काम करून देण्यासाठी तसेच अवैद्य धंदे चालविण्यासाठी पैशाची मागणी करणार्या भ्रष्टाचारी अधिकारी – कर्मचारी यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंध विभाग पुन्हा सज्ज झाले आहे. यावर्षी 24 जानेवारीला पहिला दणका देत भूमी अभिलेख विभागात पहिली कारवाई करण्यात आली आहे.
लाच स्वीकारण्यामद्धे ग्रामविकास विभाग आगरसार ठरला असून मागच्या वर्षी एकूण 4 कारवाया या विभागातील अधिकारी कर्मचार्यांवर झाल्या. दुसर्या क्रमांकावर पोलिस विभाग असून येथे 3 कारवाया करण्यात आल्या. याच बरोबर महसूल विभाग , कृषि विभाग , महिला व बाल कल्याण विभाग आणि उप प्रादेशिक विभाग (आरटीओ) प्रत्यकी एक एक कारवाई झाली होती.
सध्या गोंदिया जिल्हातिल देवरी येथून जाण्याच्या महामार्गावरील आरटीओ चेक पोस्ट (सीमाशुल्क तपासणी नाका ) येथे अवैद्य वसूली करून वाहने सोडून सर्रास लूट होत असल्याचे वृत्त विविध वर्तमान पत्रात प्रकाशित झाल्यामुळे परिवहन विभाग चांगलाच चर्चेत आहे. दर महिन्याला वाहन मालकांकडून लाखो रुपये वसूल होत असल्याचे चर्चा रंगल्या आहेत. यावरून शासनाला करोडो रुपयाचा चुना लावण्याचे काम सबंधित विभागातील अधिकारी करील असल्याचे वृत्त आहे. या विभागातील अधिकारी खाजगी मॅनेजर ठेवून अवैद्य पैसे वसूल करीत असल्याचे वृत्त आहे.
पैसे मागणार्यांची तक्रार केल्यास आपले काम होणार नाही या भीतीमुळे सामान्य नागरिक लाचखोरांची तक्रार करीत नसल्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेत लाचखोर घेतात भीती न बाळगता बिनधास्त तक्रार करा असे विभागाकडून सांगितले आहे. काम नियमात बसत असल्यास सबंधित विभाग काम करून देण्यासाठी सहकार्य करतो.