समर्थ महाविद्यालयात सूर्यनमस्कार उपक्रम
लाखनी 7: राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य 75 कोटी सूर्यनमस्कार प्रकल्प अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात पतंजली परीवार, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, छात्र सेना, दत्त मंदिर परिवार यांच्या सहकार्याने सूर्यनमस्कार उपक्रम साजरा केला गेला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य प्रा अरुण कडबे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून आरोग्य प्रमुख सौ शीला माटे, ग्रामीण रुग्णालय, केसलवाडा व या उपक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगंबर कापसे उपस्थित होते. वर्षभर महाविद्यालयात योग आणि सूर्यनमस्कार नित्यनियमाने घेण्यात येत असते. या या उपक्रमात मोठ्या संख्येने योग प्रेमी सहभागी झाले होते. प्राध्यापक अरुण कडबे योगाचे महत्व सूर्यनमस्कार मंत्रोपचार यामुळे मनुष्य आपली कार्य कसे सकारात्मक पद्धतीने करू शकतील याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. शीला माटे यांनी सूर्यनमस्कार महत्त्वाचे आहेच सूर्यनमस्कारामुळे कॅन्सरवर ही मात करू शकतो यावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर कापसे यांनी अशा अनोख्या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातून नेहमीच होत असते. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 75 कोटी सूर्यनमस्कार या उपक्रमात महाविद्यालय प्रत्यक्षात सहभागी झाला आहे कौतुक केले. यावेळी डॉ. धनंजय गभने, प्रा लालचंद मेश्राम, प्रा धनंजय गिरहेपुंजे, प्रा अजिंक्य भांडारकर, प्रा रामटेके, डॉ अनिता दाणी, डॉ सुनंदा देशपांडे, प्रणाली सावरकर, निशा गायधनी, गोविंदा पडोळे, सुधीर बावनकुळे, माजी नगरसेवक मनोज टहिल्यानी, नेहरू युवा समन्वय सौरभ बोरकर, अभिषेक चोले, लोकेश फसाटे, शुभम बोरकर, रोहित फसाटे आदी मोठ्या संख्येने योग प्रेमी उपस्थित होते. संचालन प्राध्यापक धनंजय गिरेपुंजे व आभार डॉ बंडू चौधरी यांनी केले.