भर कोर्टात फिर्यादीने भिरकवली न्यायाधिशांकडे चप्पल

गोंदिया: न्यायालयीन खटल्यात आरोपींनी न्यायाधिशांवर भौतिक वस्तू भिरकवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र न्याय मागणार्‍या फिर्यादीने न्यायाधिशावर चप्पल भिरकावल्याची घटना आज, 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालयात घडली. या घटनेमुळे संपूर्ण न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे. रवी काकडे (47 रा. सूर्याटोला) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आजघडीला आरोपी झालेला व चप्पल भिरकलव्यापूर्वी तक्रारकर्ते असलेले रवी काकडे यांनी चार वर्षापूर्वी एका शिक्षकाला 4 लाख रुपये उसणवार दिले होते. त्यावेळेस त्या शिक्षकाने रक्कमेचा परतावा म्हणून 4 लाख रुपयांचा धनादेश रवी काकडे यांना दिला. रवी काकडे यांनी तो धनादेश वटविण्यासाठी बँकेत दिला असता तो वटला नाही. यासंदर्भात रवी काकडे यांनी जिल्हा न्यायालयाच्या पाचव्या सहदिवाशी न्यायाधीश, क स्तराकडे याचिका न्यायप्रविष्ठ केली. चार वर्षापासून याप्रकरणी सुनावनी सुरु होती. यातंर्गत आज, 5 जानेवारी रोजी न्यायालयात सुनावनी सुरु असताना रवी काकडे यांने न्यायाधिशांवर चप्पल भिरलकाली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती.

Print Friendly, PDF & Email
Share