गोंदिया: जिल्हात प्राथमिकच्या शाळा सुरु करा, RTE चे थकीत देयके त्वरीत द्या-

◾️व्हेस्टाच्या शिष्टमंडळांचे शिक्षणाधिकारी व उपजिल्हाधिकार्याना निवेदन

गोंदिया 05: कोरोणाकाळात,इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानीत शाळांवर आर्थिक संकट ओढविले असून यासाठी शासनाचे धोरण कारणीभूत ठरले आहे.त्यातच सर्वत्र 1 ते 7 शाळा सुरु झालेल्या असताना गोंदिया जिल्ह्यात मात्र अद्यापही परवानगी दिली न गेल्याने विजनरी इंग्लिश स्कूल ट्रस्टी एसोसिएशन,गोंदिया(व्हेस्टा)च्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करुन शाळा सुरु करण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.

शासनाने शाळा बंद तर शुल्क बंद या धोरणाला खतपाणी दिल्यामुळे,पालकवर्ग शुल्क द्यायला नकार देत असल्याने शाळांचे व्यवस्थापन कसे चालवायचे अशा प्रश्न उपस्थित झालेला आहे.त्यातच आर.टी.ई प्रवेशाचे प्रलंबित देयके निकाली न काढल्यामूळे संस्थाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत.या सर्व मुद्यावर सामंजस्याने मार्ग काढून न्याय देण्यात यावे यासाठी विजनरी इंग्लिश स्कूल ट्रस्टी एसोसिएशन, गोंदिया, विदर्भ शिक्षण संस्था संघटना,जिल्हा गोंदियाच्या शिष्टमंडळाने प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे व निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांना निवेदन सादर करुन चर्चा केली. शिष्टमंडळात अजय पालीवाल,एन.ए.एस.स्वामी, आर.डी.कटरे,खुशाल कटरे,प्रकाश पंचबुद्धे, नरेश शहारे, शिवेंद्र येळे, श्री.ताजणे उपस्थित होते.

Share