अभिमानास्पद ! देवरीच्या ड्राइवरच्या मुलाची MBBS साठी निवड
◾️देवरी तालुक्यातील वाहन चालकाच्या मुलाची MBBS साठी निवड, कौतुकाचा पाऊस
डॉ. सुजित टेटे /प्रहार टाईम्स
देवरी 01: आदिवासी आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यातील एका वाहन चालकाच्या मुलाने NEET परीक्षेत यश संपादन करीत आपल्या जिल्ह्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया (GMC ) मध्ये MBBS ला प्रवेश मिळविला आहे. अविनाश विजय निर्वाण असे सदर विद्यार्थ्यांचे नाव असून त्याचे सर्वीकडे कौतुक करण्यात येत आहे .
अविनाश चे वडील खाजगी वाहन चालवून आपली आणि कुटुंबाची उपजीविका भागवितात. कुटुंबात एकही डॉक्टर नसल्यामुळे अविनाशच्या डॉक्टर होण्याची लहानपणापासूनच इच्छा होती. याचे प्राथमिक ते 12 पर्यन्तचे शिक्षण देवरीमध्ये झाले असून यांची MBBS करीता गोंदिया येथे निवड झाली आहे
सप्टेंबर २०२१ ला झालेल्या NEET च्या परीक्षेत अविनाश निर्वाण भारतातून ३९६४५ क्रमांकावर आहे. मागील ३ वर्षांपासून त्याने MBBS साठी घेतलेली मेहनत आज पूर्णत्वास आली आहे.
अविनाशने आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील , कुटुंबीय तसेच त्याच्या शिक्षकांना दिले आहे. त्याने मिळविल्या यशा बद्दल तालुक्यात कौतुकाचे वर्षाव सुरु आहे.