आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना २४ तास विज पुरवठा करा.
आमदार कोरोटे यांची ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांच्याकडे मागणी
देवरी, ता. ५: सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या नक्षलग्रस्त आदिवासी दुर्गम आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता ८ तास ऐवजी २४ तास विज पुरवठा करा या मागनीला धरून आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांच्याशी भेट घेवून विज पुरवठा संबंधात सविस्तर चर्चा केली. आणि निवेदन सादर करुण २४ तास विज पुरवठा सुरु ठेवन्याचे आदेश विज वितरण कंपनीला देण्याची मागणी केली.
सादर केलेल्या निवेदनात आमदार सहषराम कोरोटे यांनी म्हटले आहे की, माझ्या आमगांव-देवरी विधानसभा मतदार संघात देवरी, आमगांव व सालेकसा असे तीन तालुका मोळतात. येथील शेतकऱ्यांचे शेती हाच एकमेव उपजीवीकेचे साधन आहे.परंतु वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे पूर्वीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसमोर शेतीवर सिंचनाच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कारण विज वितरण कंपनी द्वारे फक्त ८ तास विज पुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत त्यांच्यापुढे शेतातील सिंचनाकरिता सदर ८ तास विज पुरवठा अपुरा पड़त असल्याने या क्षेत्रातील शेतकरी हा चिंतेत असून सिंचनाच्या गंभीर प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.
तरी आपल्या अधिनिस्त असलेल्या विजवितरण कंपनीला आपण आदेश देंवुन आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना ८ तासाऐवजी २४ तास विज पुरवठा उपलब्ध करुण द्यावे ह्या मागणी संदर्भात आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांची भेट घेवून चर्चा केली आणि निवेदन सादर केले.