चिचगड ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा; आरोग्य सेवेचा बोजवारा
भुपेन्द्र मस्के । प्रहार टाईम्स
चिचगड: राज्यभरातील ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय मध्ये सुमारे राज्याच्या आरोग्य विभागाकडून 429 हून अधिक प्रकारच्या गोळ्या-औषधांचा साठा असतो. मात्र, या पैकी अनेक प्रकारच्या गोळ्या-औषधे उपलब्ध नसल्याने काही ठराविक गोळ्या-औषधांचा वापर रुग्णांसाठी होतो. लहान बालकांसाठी साधी जंताची औषधी Albendazole सायरप अपलब्ध नाही. त्यामुळे चिचगड क्षेत्रातील नागरिकांचे हाल होत असून ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
चिचगड ग्रामीण रुग्णालय रूग्णालयात एक्स रे मशिन बंद, रिक्त पदे न भरल्यामुळे डॉक्टर व कर्मचारी यांची कमतरता अगोदरच सुविधांची कमतरता वानवा असतांना औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याने रूग्णांचे हाल होऊ लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित फार्मासिस्ट नाहीत.त्यामुळे आरोग्य सेवेचा कारभार म्हणजे ‘रोजचे मरे त्याला कोण रडे’ असा झाला असून जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत काहीच कारवाई करत नसल्याने कोमात गेलेली आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार? हा सवालच आहे. गोर गरीब आणि अडाणी लोकांचा वैद्यकीय क्षेत्र आणि डॉक्टरांवर भाबडा विश्वास असल्याने अनेकदा मिळणाऱ्या अपुऱ्या सोईसुविधा व औषधांवर सर्वसामान्य नागरिक समाधान मानत असल्याचे चित्र बघावसाय मिळत आहे . त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे फावले असून याबाबत जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे उदासीन असल्याने न मिळणाऱ्या सेवा कधी सुरू होणार? यासह विविध मूलभूत प्रश्न सुटत नाहीत हे चिचगड क्षेत्रवासियांचे दुर्दैवच आहे.