भाजप महिला आघाडी देवरी तर्फे उद्या हळदी कुंकू कार्यक्रम

देवरी 28: नवीन वर्ष आणि मकरसंक्रांतीच्या औचित्यावर भाजप महिला आघाडी देवरी तर्फे उद्या (29 जानेवारी ) हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम भाजप कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग 6 येथे दुपारी 12 ते 4 वाजता भाजप तालुका अध्यक्ष देवकी ताई मरई महिला आघाडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला असून हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम अंबिका बंजार तालुका महामंत्री , अंजु बिसेन महामंत्री , अर्चना येटरे , माया निर्वाण शहर अध्यक्ष , रचना उजवणे शहर महामंत्री यांच्या उपस्थित पार पडणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share