देवरी येथे येत्या शनिवारी निशुल्क कॅरिअर मार्गदर्शन शिबिर व मोफत पुस्तक वाटपाचे आयोजन

■ आमदार कोरोटे यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन.

देवरी २७: गोंदिया जिल्ह्यात आदिवासी अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या आमगांव/देवरी विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब लोकांच्या मुलां/मुली हे पुढे उच्च शिक्षण घेवून आपले कॅरिअर आणि भविष्य सुरळीत करावे या उद्देशाने या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी देवरी आमगांव व सालेकसा तालुक्यातील विज्ञान विभागातील १२वी च्या गरीब विद्यार्थ्यांकरीता नागपुरच्या आधार फाउंडेशन बहुउद्देशीय शिक्षण संस्थे मार्फत येत्या शनिवारी(ता.२९ जानेवारी) रोजी मोफत सेमिनार आणि निशुल्क कॅरिअर मार्गदर्शन शिबिर यात जे.ई.ई(JEE), नीट(NEET) एमएचटी- सेट(MHT-CET) चे प्रशिक्षण व या शिबिरात सहभाग घेणाऱ्या ५०० विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन येथील देवरी-आमगांव मार्गावरिल सिताराम लॉन येथे करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरात एकूण ५०० विद्यार्थी व त्याचे आई-वडील अशा १५०० लोकांची बसन्याची सोय करण्यात आली आहे. तरी या विधानसभा क्षेत्रातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेवून याचा लाभ घ्यावा असे आमदार कोरोटे आणि आधार फाउंडेशन चे अध्यक्ष दिनेश मलिये व सचिव मुकेश चौबे यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share