◾️आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले याचाही मृतकात समावेश
वर्धा 25: जिल्ह्यातील देवळी-वर्धा या महा मार्गावर रात्री भरधाव कार पुला खाली कोसळून सर्वचे सर्व सात जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले याचाही समावेश असल्याचे कळले आहे. त्यामुळे रहांगडाले कुटुंबावर दुःखाची कुर्हाड कोसळली आहे.

मृत सर्व सात ही जण हे सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिकल(MBBS) चे विद्यार्थी असून ते मध्यरात्री वर्धेला येत असतांनी भरधाव कार वरून चालकाचे नियंत्रण सुटले व कार 40 फूट पुलाखाली कोसळली. त्यात सर्व सात ही विद्यार्थी जागीच ठार झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशा: चिरडली गेली. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलीस व सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले व मृतकांची माहिती मिळवून त्यांच्या परिवाराला कळविले. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहेत.








