संपादकीय: गोंदिया जिल्हात प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्याविनाच ! देशभक्ती, राष्ट्रप्रेम रुजवायची कशी ?

प्रा.डॉ.सुजित टेटे

राष्ट्रीय सण म्हंटले तर शाळा आणि विद्यार्थ्यांचा महत्वाचा वाटा असणारे उत्सव. याच उत्सवातून शाळा भावी पिढी घडणीण्यासाठी तसेच देशभक्ती, राष्ट्रप्रेम याची बीजे रुजविण्यासाठी तत्पर असते. भावी पिढीला स्वतंत्र दिवस, प्रजासत्ताक दिवस याची प्रचिती शाळा महाविद्यालयातूनच मिळत असते परंतु 2020 पासून कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम देशभक्ती या महत्वाच्या मूल्य शिक्षणापासून दूर ठेवलेले आहे. शाळा आभासी पद्धतीने प्रयत्न करतात परंतु गोंदिया सारख्या आदिवासी नक्षलग्रस्त जिल्हात आभासी पद्धती निरर्थक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra शासनाने 24 जानेवारी पासून शाळा सुरु करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले परंतु आता पर्यंत कुठलेही आदेश आले नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा भंग झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय सण साजरे करतांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा महत्वाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून संस्कृतीचे दर्शन घडत असते परंतु विद्यार्थ्यांना यामधून डावलल्यामुळे राष्ट्रप्रेम , देशभक्ती विद्यार्थी जीवनात प्रत्येक्षात रुजवायची कशी असा सवाल उपस्थित झाला आहे.

यादिवशी मोठ्या उत्साहात विद्यार्थी भाषण , देशभक्ती गीते , नृत्य सादर करतात परंतु शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ लुप्त होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असलेल्या पालकांवर झाला असून भावी पिठीवर गंभीर परिणाम होणार असल्याचे नाकारता येत नाही.

प्रजासत्ताक दिनी राजकीय व्यक्ती , सामाजिक सेवक , प्रतिष्ठित व्यक्ती यांना परवानगी देण्यात आलेली आहे परंतु विद्यार्थ्यांना या महत्वाच्या दिनी डावलल्यामुळे येणाऱ्या भावी पिढीच्या भवितव्यासोबत खेळ खेळल्यासारखे चुकीचे ठरणार नाही. याला आपणच जबाबदार ठरत आहोत हे मात्र निश्चित!

Share