समूह साधन केंद्र देवरी येथे मुख्याध्यापक-केंद्रप्रमुखांची सभा संपन्न

◾️केंद्रप्रमुख भानारकर यांच्या उपस्थितीत विविध शैक्षणिक विषयावर झाली चर्चा

देवरी 24: देवरी तालुक्यातील देवरी केंद्रातील मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांची सभा नुकतीच पार पडली असून यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सदर सभेत सर्व व्यवस्थापनाचे शाळेचे मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेचे विषय आधार कार्ड माहिती, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, मतदार दिवस साजरा करणे, वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे, सूर्यनमस्कार उपक्रम, 1 ते 8 मध्ये वयानुरूप दाखल विद्यार्थी, निष्ठा प्रशिक्षण, एक भारत श्रेष्ठ भारत, मोफत गणवेश योजना, संच मान्यता, Read to me उपक्रम, जुने पाठ्यपुस्तके परत घेणे, 14 जाने ते 28जाने., मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणे, 5 वी ते 8 वी भरारी उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरणे, अभ्यासक्रमाला 2.0, ITI मल्टिस्किल उपक्रम , वाहतूक सुविधा, शाळा बाह्य सर्वेक्षण, वाचन उपक्रम, शाळा बाहेरची शाळा, 15 ते 18 वयोगट लसीकरण, शालेय पोषण आहार योजना आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान स्थानिक प्रशासनाचे आदेश मिळताच शाळा नियोजनपूर्वक सुरु करावे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांनी तत्पर राहावे असे भानारकर म्हणाले. कोरोना नियमाचे पालन करून सदर सभा यशस्वीरित्या पार पडली.

Share