पोलिस उपविभाग देवरी तर्फे निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

प्रहार टाईम्स / डॉ. सुजित टेटे

देवरी 22: पोलिस उपविभाग देवरी यांच्या तर्फे विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त विध्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक गोंदिया ,अपर पोलिस अधीक्षक देवरी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी केले आहे.

निबंध स्पर्धा 21 वर्षे पर्यन्त तर चित्रकला स्पर्धा 5 ते 18 वर्षे वयोगतील विद्यार्थ्याकरिता असून 24/01/2022 पर्यन्त 9011056816 या व्हाट्स अप्प क्रमांकावर pdf स्वरुपात पाठवायचे आहे.

निबंधाचे विषय –

नक्षलवाद एक आव्हान

लोकशाही ची यशोगाथा

कोरोनाचा सामना करणारे आम्ही

मी कलेक्टर झालो तर

माझे प्रिय गाव

माझा प्रिय गोंदिया जिल्हा

चित्रकला स्पर्धेचे विषय –

सोनेरी पहाट

निसर्ग रम्य वातावरण

शाळेतील खेळाचा तास

आदर्श पोलिस स्टेशन

मी पाहिलेले अभियारण्य

सादर स्पर्धे मध्ये उत्कृष्ट 3 विजेत्याला बक्षिसे आणि प्रशस्तीपत्र तसेच प्रोत्साहानपर बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Share