सावित्रीच्या जन्मदिनी महिलांचा भाजप प्रवेश

देवरी महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम स्थानिक भाजप कार्यालयात महिला तालुकाध्यक्षा देवकी मरई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यात भाजपच्या आजपर्यंतच्या उत्तम कार्यप्रणालीवर खुश होऊन ग्रामीण भागातील अनेक महिला भगिनींनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार तथा प्रदेश कार्यकारिणी सचिव संजय पुराम, जिल्हा उपाध्यक्ष झामसिंग येरणे, प्रमोद संगीडवार, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव नाईक, श्रीकृष्ण हुकरे, सुखचंद राऊत, भाष्करराव धरमशहारे, तालुका महामंत्री विनोद भांडारकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष छोटू भाटीया, महामंत्री योगेश ब्राह्मणकर, सोनू चोपकर, दिनेश भेलावे, अनुसूचित जातीजमातीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास शिंदे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष इमरान खान, जि.प. माजी सभापती सविता पुराम, माजी नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे, सरपंच अंजू बिसेन, छाया गावड, प. स. माजी सदस्या सुनिता गावडकर, तालुका महामंत्री अंबिका बंजार, प्रज्ञा संगीडवार, कमल मेश्राम, पिंकी कटकवार, सुषमा वैद्य, सौ. झिंगरे, विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने आणि उपाध्यक्ष दीपक शाहू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
तर अर्चना येटरे, मिना डोंगरवार, पुष्पकला बागडे, ज्योती बारसे, लता बहेकार, सुलकन तरोणे, मंगला तरोणे, कल्पना खोटेले, संगीता खोटोले, पारबता फुंडे आणि सागन मडावी अशा अनेक महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फोटोला माल्यार्पण करुन भाजपमध्ये प्रवेश केला.

Share