बिरसी विमानतळावरुन उडणार जानेवारीअखेर प्रवासी विमान : फ्लाय बिग एअरलाईन्स सेवा
◾️फ्लाय बिगचे विभागीय प्रमुख रतन आंभोरेनी केली विमानतळाची पाहणी
◾️इंदोरा- गोंदिया-हैद्राबाद नंतर रायपूर-गोंदिया पुणे- गोवा विमानसेवेचाही विचार
गोंदिया 06-. शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिरसी विमानतळाचा जिर्णोद्धार होवून 10 वर्षांचा काळ लोटला. यादरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. आता फ्लाय बिग एअरलाईन्स या कंपनीने उत्सुकता दाखविली असून चालू जानेवारी महिन्यातच शेवटपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. त्याकरिता कंपनीच्या विभागीय प्रमुखांनी विमातळाची पाहणी केली.
बिरसी विमानतळाच्या पुनर्बांधणीनंतर येथून प्रवासी उड्डाण सुरू करण्यात यावे, अशी मागणी गेल्या 10 वर्षांपांसून होत आहे. मात्र विविध अडचणी येत होत्या. आता मात्र फ्लाय बिग या प्रवासी विमान वाहतूक कंपनीने बिरसी विमानतळावरून सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्यात असल्याचे म्हटले आहे.
इंदौर-बिरसी-हैदराबाद-चेन्नई अशी वाहतूक असणार आहे. कंपनीकडे चार एअरक्राफ्ट असून 72 किंवा 80 आसनक्षमता असणारे विमान आठवड्यातून चार दिवस बिरसी विमानतळावरून सुटणार आहेत. येत्या काही दिवसांत दुसऱ्या टप्प्यात बिरसी विमानतळावरून विमानसेवांचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या इंदोर-बिरसी-हैदराबाद-चेन्नई विमानसेवा याच महिन्यात सुरू होण्याची शक्यता असून त्याकरिता फ्लाय बिग कंपनीचे विभागीय प्रमुख रतन आंभोरे यांनी(दि.4) पाहणी करुन आढावा घेतला.त्यावेळी त्यांनी येत्या काळात गोंदिया ते पुणे, गोवा, रायपूर-गोंदिया-पुणे-गोवा आदी मार्गांवर देखील प्रवासी विमान वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तविली आहे.
गोंदियाकरीता इंदोरवरुन सकाळी 7.15 ला विमान निघेल 8 वाजता गोंदियाला पोचेल.8.25ला गोंदियावरुन हैद्राबादकरीता नि
दिव्यांग व वयोवृध्द प्रवाशांना व्हिलचेयरने नेण्याची व्यवस्था कुठल्या रस्ताने असेल,रनवेपर्यंत बससेवा आणि अंतर किती असेल,प्रवासी कुठल्या गेटने आत येईल व बाहेर जाईल,सोबतच प्रवासी आपले साहित्य कुठून घेणार यांसदर्भातला आढावा तसेच तिकिट काऊंटरसह फ्लायबिग कंपनीचे कार्यालयाकरीता जागा कुठे असेला याचा आढावा फ्लाय बिग कंपनीचे विभागीय प्रमुख रतन आंभोरे यांनी खा.सुनिल मेंढे,गजेंद्र फुंडे व बिरसी विमानतळाचे व्यवस्थापक बैजू यांच्यासोबत घेतला.
उड्डाण सेवेचा लाभ
ज्या विमानतळावरून प्रवाशांची संख्या कमी आहे, त्यात प्रवाशांना तिकीट कमी दरात(2000-2200 रुपये) उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने उड्डाण नावाची योजना सुरू केली. त्याचा लाभ देखील या विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे गोंदिया – इंदौर- हैद्राबाद ते चेन्नईकरिता केवळ दोन हजार रुपये तिकीट असणार आहे. विमानतळावरील आरक्षण खिड़की आणि इतर सुविधांची पूर्तता झाल्यास येत्या 26-30 जानेवारीपासून प्रवासी सेवा सुरू होणार माहीती खासदार सुनिल मेंढे यांनी दिली.
स्थानिक काही अडचणी सोडविण्याचे प्रयत्न सुरु
बिरसी विमानतळावरुन हवाई सेवा सुरु करण्यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी फ्लायबिग कंपनीचे अधिकारी 4 जानेवारीला येऊन गेले.त्यांनी विमानतळाची पाहणी करीत तिकिट काऊंटर ठेवण्यापासून इतर त्यांना लागणार्या सोयींची पाहणी केली आहे.परत 20 जानेवारीला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून त्यात पुर्ण आढावा घेतला जाणार आहे,तोपर्यंत शिल्लक अडचणी निकाली काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक के.व्ही.बैजू यांनी दिली.
विमानतळवारील सुरक्षा महाराष्ट्र पोलिसांच्या हाती
विमानतळावरुन प्रवासी वाहतुक सेवा सुरु झाल्यानंतर तेथील सुरक्षा व्यवस्थेसाठी सध्या सुरक्षेसाठी तैनात असलेले महाराष्ट्र पोलीसांचीच सेवा घेण्यात येणार आहे.यामध्ये प्रवासांची तपासणीपासून साहित्य स्क्रिनीगंपर्यतचे सर्व कार्य महाराष्ट्र पोलीस करणार आहेत.