मोठी घोषणा…राज्यात पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’
मुंबई: कोरोनाने राज्यात कहर केला असताना मुंबई पोलिसांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात असताना मुंबई पोलिसांना मात्र २४ तास कर्तव्यावर हजर राहावं लागत आहे. यामुळेच त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ७१ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान राज्याचा गृहविभागाने पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांनाही खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहे. पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे.
Covid guidelines are issued by the Chief Secretary and we should abide by them to keep ourselves safe from the virus. Police officers above 55 years of age are advised not to go for duty, they can work from their homes: Maharashtra Home Minister Dilip Walse Patil pic.twitter.com/AZ3T4BKePG
— ANI (@ANI) January 6, 2022
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की “आपण ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला आहे. त्यांनी कर्तव्यावर न येता घरुन काम करायचं आहे”. तसंच पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राज्यातील निर्बंधांबाबत काही अतिरिक्त माहिती देण्यास नकार दिला. राज्यात आतापर्यंत ९५१० पोलिसांना करोनाची लागण झाली असून १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल २६ हजार ५३८ नव्या करोनाबाधितांची भर राज्याच्या एकूण आकड्यामध्ये झाली.