TET परीक्षा घोटाळा समोर येताच 2013 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांचे TET प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश
◾️बोगस शिक्षकांचा होणार भंडाफोड
◾️सेटिंग करून रुजू झालेल्या शिक्षकांची नावे येणार समोर
गोंदिया 04: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना परीक्षांमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्यानंतर महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरी टाकलेल्या पहिल्या धाडीत 88 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीतही दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली होती. तुकाराम सुपे यांच्या घरी दुसऱ्या धाडीत आणखी पैशाचे घबाड सापडले होते . सुपेंच्या घरातून पोलिसांना तपासात दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने हस्तगत केले होते.
सदर घोटाळा समोर येताच शिक्षण विभाग कामाला लागले असून 13/02/2013 सेवेत रुजू झालेल्या विना अनुदानित , अनुदानित , अंशतः अनुदानित ,अल्पसंख्याकं माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे TET प्रमाणपत्र तात्काळ 05/01/2021 ला सादर करण्याचे आदेश गोंदियाचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक )प्रदीप समरीत यांनी पत्राद्वारे दिले आहे.
यामुळे 2013 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांचे वेरिफिकेशन होणार हे निश्चित ! यातून “दूध का दूध और पाणी का पाणी” अलग होऊ शकते.