पोलीस मदतकेंद्र कोठी तर्फे आयोजित आधार कार्ड मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस अधिक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधिक्षक सोयम मुंडे व अप्पर पोलीस अधिक्षक समीर शेख , अप्पर पोलीस अधिक्षक अनुज तारे अहेरी यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन भव्य आधार कार्ड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर आधार कार्ड आयोजन चे उद्घाटन कोठी गावचे प्रतिष्ठीत नागरिक मासु रामा लेकामी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी श्रीनिवास धुळे यांनी करून भविष्यात आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, जॉब कार्ड, व इतर शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

तरी सदर मेळाव्यास कोठी हद्दीतील अतिदुर्गत भागातील मरकनार, तोयनार, पदुर, पिडमीली, गुंडूरवाही, पोयारकोठी, व कोठी गावचे १५० ते २०० नागरीक बहूतांश नागरिक कॅम्प करिता हजर होते. 

सदर मेळाव्यामध्ये पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातुन खालील सुविधांचा लाभ देण्यात आले.
– आधार कार्ड – नवीन – ०२
– जॉब कार्ड – ०२ प्रस्ताव
– ई-श्रम कार्ड – ०७
– आधार कार्ड नुतनीकरण – ५१
– प्रधानमंत्री जिवन सुरक्षा विमा योजना – ५०

सदर मेळावा यशस्वी होण्याकरिता प्रभारी अधिकारी श्रीनिवास धूळे, पोउपनि/ वाघ सा. यांनी तसेच जिल्हा पोलीस एस.आर.पी.एफ अंमलदार, संघभावनेने परिश्रम घेवून सदर मेळावा यशस्वीरित्या पार पडला.

Share