राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लावण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत : दोन दिवसांत निर्णय

वृत्तसंस्था / मुंबई : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येत होणारी वाढ पाहता आता राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, काल महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना बाधितांची एकूण संख्या 11492 इतकी होती आणि आज ही संख्या 29 हजारावर जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत 1300 सक्रिय रुग्ण आहेत आज संध्याकाळी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. रुग्ण दुप्पटीचे प्रमाण वाढत आहे. सक्रिय रुक्णांची संख्या दररोज ही 400 ते 500 होती पण आता ही संख्या 2000 च्या पुढे आज असण्याची शक्यता आहे. 

मुंबईत दररोज 51 हजार चाचण्या केल्या जात आहेत. सध्या 2200 केसेस सापडत आहेत त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट 4 वर आहे. हा पॉझिटिव्हिटी रेट नक्कीच चांगला नाहीये. यामुळे आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध लावण्यात आले आहेत. मॉल्स, रेस्टॉरंटवर निर्बंध लावण्यात आले आहेत असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

मुख्यमंत्री घेणार निर्णय
आपल्या येथे जर निर्बंधांचे पालन केले नाही आणि सहजासहजी सर्व गोष्टी घेतल्या तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आपल्याया करावेच लागेल. निर्बंध लावण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग एकत्रितपणे घेईल. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल आणि कदाचित थोड्या प्रमाणात निर्बंध लावण्यावर निर्णय होऊ शकेल असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

पोलिसांना सांगून बंधने
आरोग्यमंत्री म्हणाले, लग्न समारंभ असतील किंवा इतर मोठे कार्यक्रम सुद्धा कुठलेही नियमांचे पालन न करता होत आहेत त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांना आणि प्रशासनाला सांगून बंधने आणावी लागतील.

राज्यात ओमायक्रॉनची संख्या
राज्यात ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या 167 इतकी झाली आहे. त्यापैकी 91 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. ओमायक्रॉन बाधितांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाहीये. रुग्ण वाढत असल्याने तो निश्चितच काळजीचा विषय आहे.

मुंबईतील कोरोनाची स्थिती
28 डिसेंबर 2021 रोजी मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एकाच दिवसात 2172 रुग्ण आढळले आहे. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत आहे. त्यामुळे राजधानी मुंबईची चिंता वाढली असून मुंबईसाठी वेगळ्या उपाययोजना आणि नियम बनवण्यात येण्याची शक्यता सध्या चर्चेत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतदेखील मुंबई आणि परिसरात सर्वाधिक केसेसची नोंद कऱण्यात आली होती. त्यानंतर आता ओमिक्रॉन व्हायरसच्या सर्वाधिक केसेसही मुंबईतच आढळून येत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share