लसीकरण जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांची सावली गावाला भेट
देवरी 29: लसीकरणाच्या जनजागृती साठी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी ज्या लोकांनी लसीचा लाभ घेतलेला नाही त्यांना त्वरित लशीचा लाभ घ्यावा व तिसऱ्या लाटेपासून आपण सुरक्षित राहावे याविषयी माहिती दिली यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी अनमोल सागर , खंडविकास अधिकारी चंद्रमणी मोडक , महेंद्र मोटघरे गट शिक्षणाधिकारी यावेळी उपस्थित होते. लसीकरणामुळे कोरोना पासून बचाव होऊ शकतो याविषयी दीपक कापसे मुख्याध्यापक सावली यांनी गावात जनजागृती केली. तसेच गावात व्हाट्सअप द्वारे लसीकरणाविषयी जनतेच्या मनात लस न घेण्याविषयी भ्रामक कल्पना दूर करण्याचे प्रयत्न केले. या जनजागृतीमध्ये शिक्षक दीपक लांजेवार ,नंदकिशोर शेंडे, तुषार कोवाले, कू.वर्षा वालदे, ग्यानिराम चांदेवार या सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.