आ. सहषराम कोरोटे यांचा रजत महोत्सवात सत्कार

अर्जुनी मो 29: आदिवासी हलबा-हलबी समाज संघटना व कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त वि.द्यमाने समाज एकता व शक्ती दिवसानिमित्त रजत महोत्सवाचे आयोजन अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली/राजोली येथे २६ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांचा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद््घाटन कोरचीचे तहसीलदार सी.आर. भंडारी यांच्या हस्ते हलबी-हलबा समाज महासंघ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष शालीकराम मानकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमाला अर्जुनी मोरगावचे माजी सभापती तानेश ताराम, ध्वजारोहण नागपूरचे सेवानवृत्त पोलिस उपायुक्त बी.के.गावराणे, दिप प्रल्वलक म्हणून हलबा-हलबी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष फरेंद्र कुत्तीरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कर्मचारी महासंघ गडचिरोलीचे अध्यक्ष माधवराव गावड, वर्धाचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कुरसुंगे, बी.एस.एन.एल. चंद्रपूरचे सेवानवृत्त महाप्रबंधक रूपचंद कोजबे, ज्येष्ठ कवियत्री कुसमताई अलाम, सेवानवृत्त गटशिक्षणाधिकारी चंदाताई चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. दरम्यान समाज संघटना व कर्मचारी महासंघाच्या वतीने आमदार सहषराम कोरोटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात समाजातील इतर मान्यवर पदाधिकारी, समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Share