‘…तर ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते’; आदित्य ठाकरेंचा सूचक इशारा
मुंबई 29: कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅनने टेन्शन वाढवलं आहे. अशातच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा काॅलेजविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुंबईत कोरोना आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांनी महत्त्त्वाची माहिती दिली. पुढील वर्षी फेब्रुवारी काय किंवा आत्ता काय. वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. पण पॅनिक व्हायची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ओमिक्राॅन जास्त गंभीर नसल्याचा समज आहे. तसे निरिक्षणही समोर आली आहेत. पण ते तसंच राहील का? यावर सविस्तर संशोधन झालेलं नाही. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
शाळा, कॉलेज याविषयी आपण ट्रिगर लावलेले आहेत. ते हिट झाल्यानंतर त्याविषयी निर्णय घेतला जाईल. गरज पडली, तर पुढच्या आठवड्यात त्याविषयी निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.