नगर पंचायत रणसंग्राम : मतांच्या बेरीज वजाबाकीत उमेदवार अडकले, समीकरण कठीण असल्याचे स्पष्ट संकेत

◾️गटबाजी, आंतरिक कूटनीती आणि मतांच्या खरेदीने बिघडले समीकरण

देवरी 24: देवरी नगरपंचायतच्या प्रथमचरणांच्या निवडणुकी शांततेत पार पडल्या असून आता येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.

नगरपंचायत देवरी येथील महासंग्राम 15 प्रभागात चांगलाच रंगलेला दिसला यामध्ये कांग्रेस, रांका आणि भाजपा यांच्यात मोठा रणसंग्राम झालेला असून 2-3 प्रभागामध्ये शिवसेना आणि वंचित आघाड़ी यांनी सुद्धा चांगलाच दम दाखविलेला आहे.

ओबीसी आरक्षण वर मा. सर्वोच्च न्यायालय यांनी निर्णय दिल्या नंतर प्रभाग 3 आणि 14 यांना वगळता 15 प्रभागामध्ये मतदान झाले. यामध्ये राष्ट्रीय पक्ष आपआपले 10 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येण्याचा दावा ठोकत असल्याचे जोरदार चर्चा आहेत.

असे असले तरी लोकांचा चर्चा आणि बदलत्या समीकरणामुळे कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे कुठलेच संकेत नाहीत. परंतु भाजप च्या एकला चलो रे च्या रणनीती मुळे देवरी नगरपंचायतीवर काँग्रेस आणि राकां यांचे गठबंधन होऊन त्यांची सरकार बनण्याची शक्यता प्रबल आहे.

मतांच्या बेरीज वजाबाकीमध्ये आपले समीकरण कसे जुळेल यामध्ये उमेदवार अडकलेले असून समीकरण अधिक कठीण असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

एकी कडे गटबाजी , आंतरिक कूटनीती आणि क्रॉस वोटिंग ने सर्व राजकीय पक्षांचे समीकरण गोंधळात असून सुटण्याचे नाव घेत नाही आहे. यामुळे अनेक दिग्गज अनुभवी राजकारणाच्या चेहऱ्यावरचे पाणी उडालेले बघावयास मिळालेले आहे.

ओबीसी वर्गातील 2 जागांना सर्वसाधारण करिता महिला व पुरुष अशी विभागणी केल्यामुळे देवरीतील दिग्गजांनी आपली फिल्डिंग चांगलीच लावलेली दिसून येत आहे. त्यामुळे पक्षातील काही कार्यकर्ते तिकीट वाटपावरून पक्षांतराच्या चर्चेला उधाण सुटले आहे.

जुन्या पक्षातून तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करून दुसऱ्या पक्षातील तिकीट मिळविण्यासाठी फिल्डिंग ला सुरुवात केलेली दिसून येते. यामुळे दोन्ही जागेवरील दावेदारी करणारे चेहरे बघण्यास नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

असे असले तरी येणाऱ्या 19 जानेवारीला निकाल लागताच ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ स्पष्ट होणार आहे.

Share