जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत नगरपंचायतीसाठी 58 टक्के,जि.प.करीता 35 टक्के मतदान, उमेदवारांचे भवितव्य पेटी बंद
गोंदिया 21: गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 07.31 टक्के मतदान व नगरपंचायत साठी सकाळी 09.30 वाजेपर्यंत 11.90, 1.30 वाजेपर्यंत 58.69 टक्के मतदान झाले होते.जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी सकाळी 11.30 पर्यंत 22.46 टक्के मतदान झाले.आमगाव तालुक्यात 1.30 वाजेपर्यंत 48.13 टक्के व गोंदिया तालुक्यात 35.14,गोरेगाव तालुका 38.31,देवरी 54.40,सडक अर्जुनी 54.27,अर्जुनी मोर 51.27 व तिरोडा तालुक्यात 33.99 टक्के मतदान झाले आहे. नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून वयोवृध्दही थंडीचे वातावरण असतानाही मतदानासाठी घराबाहेर निघू लागले आहे. देवरी मध्ये आमदार सहसराम कोरोटे यांनी सपत्नीक जिप कन्या शाळा मतदान केंद्रावर मतदान केले.मतदारामध्ये सकाळी 11 नंतर उत्हास दिसून येत असल्याचे चित्र बघायस मिळाले. 3 वाजता नंतर ची आकडेवारी लवकरच समोर येणार आहे.
विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आज, २१ डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली.गेल्या तीन-चार दिवसापासून विदर्भात हुडहुडी वाढली आहे. कमाल तापमान हे ७.८ अंशावर आले आहे.थंडीच्या गारव्यामुळे सकाळच्या प्रहरी मतदार मतदानासाठी फारसे उत्सूक दिसले नाही. सकाळी ११ नंतर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडताना दिसून आले. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 39 जागांसाठी मतदान आणि गोंदियात जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 43 जागांसाठी मतदान झाले.
भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ पैकी ३९ जागांसाठी ३४५ तर गोंदियाच्या ५३ पैकी ४३ जागांसाठी २४३ उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. त्यासाेबतच ३८ नगर पंचायतीच्या ५४१ जागांसाठी २३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गडचिराेलीत सर्वाधिक नऊ नगर पंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक हाेत असून, तेथे ५५४ उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी जागा वगळता ही सार्वत्रिक निवडणूक हाेत आहे. ओबीसी जागांवरील आरक्षण संपुष्टात आले असून, आता १८ जानेवारी २०२२ राेजी तेथे खुल्या प्रवर्गासाठी निवडणूक हाेणार आहे. त्यामुळे २१ डिसेंबर हा निवडणुकीचा पहिला टप्पा आणि १८ जानेवारी हा दुसरा टप्पा ठरणार आहे. दाेन्ही टप्प्यातील निवडणुकीचा निकाल एकत्रितरीत्या १९ जानेवारी राेजी लागणार आहे. मतदानाची वेळ ही सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी राहणार आहे. नक्षलप्रभावित गडचिराेलीसह गाेंदियातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी तालुक्यात सकाळी ७.३० ते दुपारी ३ या वेळेत मतदान होणार आहे.
जिल्हा परिषद – जागा – उमेदवार
गोंदिया – ४३ – २४३
भंडारा – ३९ – ४१७