ब्लॉसम शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिले स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश
◾️चिमुकल्यांनी ‘ग्रीन डे’ निमित्त केली अनोखी वेशभूषा
देवरी 18: तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये ‘ग्रीन दे’ साजरा करण्यात आला. यामध्ये शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविलेला होता. प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून ‘ग्रीन डे’ पर्यावरणपर संदेश देणारा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कोरोना काळात शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर चांगलाच परिणाम पडल्याचे चित्र असतांना शाळेत आनंददायी शिक्षण हाच एक मार्ग शिल्लक आहे. विद्यार्थी विकास करण्यासाठी विविध उपक्रमातून शिक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे.
‘क्लीन सिटी , ग्रीन सिटी यही मेरी ड्रीम सिटी ‘ असे संदेश देत चिमुल्याणी आपले साजरीकरण केले. सदर कार्यक्रमाच्या आयोजन शिक्षिका मनीषा काशीवार , कलावती ठाकरे आणि प्रगती कुंडलकर यांनी केले.