उमेदवारांची धाकधूक, नवख्यांना उत्साह तर अनुभवींची ‘वेट अँड वॉच’! कोण अंदर कोण बाहेर ?

◾️नजरा उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट ?

गोंदिया 12: (डॉ सुजित टेटे ): ओबीसी आरक्षणावर १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे परंतु या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला असून ओबीसी जागा वगळून या निवडणुका न घेता सर्वच निवडणुका स्थगित करून यावर निर्णय होईपर्यंत निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उद्या (13) ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.

सदर सुनावणीवरच या निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुका रद्द होतात की ओबीसी जागा वगळून होतात हे महत्त्वपूर्ण आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तोपर्यंत वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली असून उमेदवारांनासुद्धा धीरज बाळगण्याचा सल्ला देत मतदारांच्या संपर्कात राहण्याचे सल्ले दिलेले दिसत आहे.

◾️हॉटेल, धाब्याचे ‘अच्छे दिन’ थंडावले ? ◾️


दररोज चालणाऱ्या मटण पार्ट्याचे प्रमाण अचानक कमी झाल्याने हॉटेल व धाबे सध्या ओसाड आहेत. ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उमेदवार 13 तारखे नंतर बघू असे स्पष्ट सांगत अलर्ट झाल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना दररोज मटण पार्ट्या दिल्या जात होत्या परंतु मागील तीन- चार दिवसांपासून ही गर्दीदेखील कमी झाल्याचे चित्र आहे.

◾️टच मे रहो ! नेत्यांचे उमेदवारांना सल्ले :◾️


१३ डिसेंबरला सर्वोच्य न्यायालय काय निकाल देते यानंतर या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग वाढणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा शांत आहेत. परंतु शांत न राहता मतदारसंघातील मतदारांच्या ‘टच मे रहो’ असा सल्ला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारांना दिल्याची चर्चा सर्वत्र आहे.

कोई अंदर , तो कोई बाहार ? जबरदस्त फिल्डिंग ची शक्यता ?

राजनीती मध्ये कुठेच प्रामाणिकता दिसून येत नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी हे कुठल्याही तळाला जाऊ शकतात. त्यामुळे ‘कोई अंदर तो कोई बाहार ?’ होण्याची तिव्र शक्यता नाकारता येत नाही. अनुभवी खिलाडी राजकारणीनी आपला रस्ता मोकळा करण्यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावल्याची मोठी चर्चा सध्या देवरी तालुक्यात सुरु आह. त्यामुळे सर्वांच्या नजरा उद्याच्या (13) च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share