शिष्यवृत्ती परीक्षा सराव- ‘भरारी 2021’ उपक्रमाचे सुयश: जिल्ह्यातील 1544 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण…

♦ नागपूर विभागात गोंदिया जिल्हा प्रथम…

गोंदिया: जिल्ह्यातील विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी जिल्हा परिषद गोंदिया द्वारे ‘भरारी 2021’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यात मार्गदर्शना सोबत मुलांचा सराव याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. त्याचीच फलश्रुती म्हणून या वर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळविला असून जिल्ह्यातील एकूण 1544 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

जिल्हा परिषद गोंदिया चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांच्या प्रेरणेने व तत्कालीन शिक्षणाधिकारी(प्राथ.) राजकुमार हिवारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी ‘भरारी 2021’ हा उपक्रम राबविण्याची योजना आखली गेली. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील 30 तज्ञ शिक्षकांची कोअर टीम गठित करण्यात आली होती. या टीमने संचारबंदी काळात आधुनिक IT साधनांचा वापर करून मुलांच्या अभ्यासासह त्यांच्या स्पर्धात्मक अडचणींवर मार्ग दाखविण्यास मदत केली. या उपक्रमात दररोज या शिक्षकांनी ऑनलाईन विषयवार मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. सोबतच इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी च्या वर्ग शिक्षकांची ही मदत झाली. परिणामी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याचा उत्तम निकाल लागलेला आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता इयत्ता 5 वी चे 1139 आणि इयत्ता 8 वी चे 405 असे एकूण 1544 विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र ठरले आहेत. या निकालात गोंदिया जिल्हा हा नागपूर विभागात प्रथम स्थानी आलेला आहे. या विद्यार्थ्यांची तालुकानिहाय माहिती खालील प्रमाणे आहे…

या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे, त्यांच्या वर्ग शिक्षकांचे, भरारी उपक्रमात मार्गदर्शन करणारे मार्गदर्शकांचे तसेच तत्कालीन CEO प्रदीप डांगे व शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांचे जिल्हाधिकारी नयना गुंडे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व शिक्षणाधिकारी(प्राथ.) के. वाय. सर्याम यांनी हार्दीक अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share