अरे वा ! एकाच झाडावर तीन-तीन कोब्रा सापांची मैफिल

अमरावती 22: कधी-कधी काही अशा गोष्टी आपल्या डोळ्यासमक्ष घडतात कि त्यावर विश्वास ठेवणं खरचं कठिण असतो. असाच काहीसा प्रसंग मेळघाटातील जंगलात पहायला मिळाला. येथील एका झाडावर तीन कोब्रा साप एकाचवेळी दिसून आले. सध्या याचे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

नागपूरजवळच्या मेळघाटात अनेक वन्य पशू आणि पक्षी दिसतात. त्यासाठी अनेक पर्यटक या भागातील जंगलात भ्रमंती करत असतात. अशाच एका भटकंती करणाऱ्या गटाला मेळघाटाच्या जंगलात अचानक कोब्रा दिसला. त्याच्या शेजारी आणखी एक कोब्रा बसला होता. बाजूलाही एक होता. एकाच वेळी एकाच झाडावर तीन कोब्रा बसल्याचं अद्भूत दृश्य पाहायला मिळालं. अशा प्रकारचा काळा कोब्रा दिसणं ही दुर्मिळ बाब असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
तसं जंगल म्हटलं की जंगली प्राणी, पक्षी, साप दिसणारचं. परंतु, एकाच झाडावर तीन-तीन कोब्रा दिसणं हे खरचं दुर्मिळ आहे. या आधी अनेक साप आम्ही पाहिलीत मात्र,अशाप्रकारचं दृष्य हे खरचं आश्चर्यकारक होतं, अस इथले स्थानिकांनी सांगितलं.
साप शब्द ऐकताच अनेकांना धडकी भरते. त्यातल्या त्यात कोब्रा म्हणजे अगदीच डेंजर. त्यातही अशाप्रकारे तीन कोब्रा एकाच झाडावर दिसणं याला निसर्गाचाच चमत्कारच म्हणावा लागेल.

Share