प्रवाशांच्या सोयीसाठी खाजगी बसेस भाडेतत्वावर घेणार

नागपूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवासांची गैरसोय होत आहे. प्रवासांची गैरसोय होऊ नये म्हणून स्कुल बस संघटना व प्रवासी बस संघटना यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या बसेसची संख्या याबाबत माहिती सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच वाहनांना टप्पा वाहतुकीप्रमाणे परवाना सद्याच्या संपकालावधी पुरता मर्यादित मान्यता देण्यात आली आहे. एस.टीच्या सद्याच्या भाडे दरपत्रकाप्रमाणे प्रवाशांना विना तक्रार सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 त्याचबरोबर एस.टी. महामंडळाचे उपस्थित अधिकाऱ्यांना भाडे दरपत्रक उपलब्ध करुन देण्यासाठी कळविण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाची माहिती  परिवहन कार्यालयास सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर संपकालीन कालावधीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यानुषंगाने पारित केलेले समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आलेले आहे.

सामान्य जनतेची प्रवासाबाबत कुठलीही तक्रार असल्यास त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा किंवा खालील दूरध्वनी व ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्यात यावी,  असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी कळविले आहे.    

           1) mh31@mahatranscom.in – Ph.No. 2561698 / 2543312

            2) mh40@mahatranscom.in – Ph.No. 2956348 / 2956325

3) mh49drtonagpur@gmail.com – Ph. No. 2956725

Share