मोठी बातमी! अखेर आर्यन खानला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई 28: ड्रग्ज प्रकरणात मागील काही दिवसांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असणाऱ्या आर्यन खान केसचा आज निकाल लागला आहे. यामध्ये आर्यन खानला अखेर 23 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान आणि आणखी दोघांचा जामीन मंजूर केला आहे.
आर्यन खानसोबतच मूनमून धमेचा आणि आरबाज मर्चंट याचा देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यनची बाजू न्यायालयात मांडली होती.
मुंबई एनडीपीएस कोर्टाने आर्यनचा जामीन फेटाळला होता. आर्यनसह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट यांचेही अर्ज एनडीपीएस कोर्टाने फेटाळले होते. त्यामुळे या तिघांनीही जामीनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर आता आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे.
एनसीबीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली आहे. आज हा जामीन मंजूर झाला असला तरी आर्यन खानची सुटका उद्या करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कायदेशीर नोटीस उद्या येणार आहे.