देशसेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल- समीर वानखेडे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधत असून, क्रूझवरच्या कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मालदीव आणि दुबईतील फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून NCB च्या वसुलीबद्दल नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले होते.

समीर वानखेडेंच्या पोस्टींगबद्दल मलिक यांनी आरोप केले होते. आता एनसीबीने हे आरोप फेटाळले असून प्रेसनोट जारी केली आहे. तर, समीर वानखेडे यांनीही आरोप फेटाळत मी तुरुंगात जायलाही तयार असल्याचं म्हटलंय.

मलिकांच्या आरोपांवर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितल की नवाब मलिक खोटारडे आहेत आणि वानखेडे मलिकांवर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करतील.

मंत्री मलिक यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी छोटासा सरकारी नोकर आहे, ते मोठे मंत्री आहेत. जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्जविरोधी काम करण्यासाठी ते मला तुरुंगात टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, असंही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

Share