कठीण समयी पालकांचा शिक्षण प्रणालीत महत्वाचा वाटा – प्राचार्य डॉ. सुजित टेटे

◾️ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे पालक सभा आणि चर्चासत्र संपन्न

देवरी 22: कोरोना काळात शाळा बंद पडल्यामुळे त्याचा शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम दिसून आला. देशाच्या भावी पिढीचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचे सिद्ध झाले असून त्याचा परिणाम संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर झाला आहे.

नुकतेच शाळेची घंटा वाजली असून विद्यार्थी उत्साहाने शाळेत येत आहेत परंतु दीड वर्षांपासून घरीच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांच्या वागणुकीत मोठा बदल दिसून आला आहे.

विध्यार्थ्यांच्या वागणुकीत , शैक्षणिक कला कडे मोठे दुर्लक्ष असल्याचे दिसून आल्याने ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे पालक सभा आणि चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर पालक सभेत पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक आणि वागणकी संबंधित समस्या शिक्षकांसमोर मांडल्या आणि शिक्षकांनी पालकांच्या सहकार्याने उणीवा कशा भरून काढाव्या या विषयावर चर्चा करण्यात आले.

या चर्चा सत्रात प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी पालकांचे समुपदेशन करत कठीण समयी पालकांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक करून आभार मानले.

चर्चासत्रात सर्व वर्गाच्या पालकांनी सहभाग दर्शविला असून वैशाली मोहुर्ले , नितेश लाडे , सरिता थोटे , नामदेव अंबादे , विश्वप्रित निकोडे , राहुल मोहुर्ले या शिक्षकांनी सहकार्य केला.

Share