जिल्हाधिकारी गोंदिया यांची मॉडेल स्कूल सावली ला सदिच्छा भेट

देवरी 09: मॉडल स्कूल सावली येथे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. मुख्याध्यापक दीपक कापसे , सरपंच झुलन ताई पंधरे उपसरपंच राजेश्वरीताई बिंजलेकर, पोलीस पाटील चंद्रसेन रहांगडाले, ग्रामसेवक सुनील शिवणकर, माजी सरपंच प्रभुदयाल पवार, नाजुका ताई गौतम, संतोष कंसमारे सर्व ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले.


जि. प. मॉडेल शाळा सावली येथील मनरेगा चे सुरू असलेले दहा कामांची तपासणी केली. जिल्हाधिकारी यांनी शाळेत होत असलेल्या कामाच्या व परिसर स्वच्छता व शालेय परसबाग, शाळेचे टीनाचे शेड,सुंदर बाग बघून समाधान व्यक्त केले. शाळेत अधिकाअधिक कामांना मंजुरी द्यावी व गावातील मजुरांना गावातच कामे मिळावी या उद्देशाने अतिरिक्त कामाचे नियोजन करण्याचे निर्देश ग्रामसेवक यांना दिले. दाते साहेब व बोपचे साहेब इंजिनिअर मनरेगा यांनी सुरू असलेल्या कामाविषयी इतंभूत माहिती दिली. कंपाउंड वाल ,पेविंग ब्लॉक, बोअरवेल पुनर्भरण, गांडूळ खत प्रकल्प ही 4 कामे पूर्णत्वास आलेली आहेत. माननीय जिल्हाधिकारी यांनी कामाची तपासणी करून कामाविषयी समाधान व्यक्त केले. तसेच शाळेत धान्य ठेवले असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ती त्वरित मोकळे करण्यात येतील असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यांनी शाळेची काम स्थायी स्वरूपाची असल्यामुळे ती चांगल्या प्रतीची व्हावी अशी मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांच्याकडून आशा व्यक्त केली. रेन वॉटर हार्वेस्टिंग, नाली बांधकाम ,फळ लागवड , मल्टी युनिटटॉयलेट ,ग्राउंड सपाटीकरण अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर पूर्णत्वास आणावी असे आदेश दिले. इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू असल्यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांनी राहिलेला अभ्यास पूर्ण करावा अशी आशा व्यक्त केली. तसेच सावली शाळेतील मॉडेल स्कुल घोषित झाल्यामुळे पुढील काळात शासनाच्या अनेक पायाभूत योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील असे सांगितले. जिल्हा स्तरावरील इतर योजना सावली शाळेला विशेष रूपाने देण्यात येतील असे त्यांनी आश्वासन दिले.
रमेश पंधरे , नंदकिशोर शेंडे , ग्यानिराम चांदेवार , मेंढे तलाठी वर्षा वालदे , ललित पवार , सुनिल भेलावे , दीपक शेंडे , मीनाताई राठोड अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले.

Share