मागील दोन दिवसांपासून मसेली येथील बीएसएनएलची सेवा ठप्प

कोरची: कोरची मुख्यालयापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मसेली येथे बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये मागील दोन दिवसांपासून बिघाड झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मसेली हे तालुक्यातील मुख्य गावांपैकी एक असून मसेली लगत असलेल्या प्रत्येक गावांमध्ये ही समस्या उद्भवली आहे.

काही मोबाईल मध्ये नेटवर्क असून सुद्धा संपर्क करण्यास खूप अडचण निर्माण होत आहे. तर काही मोबाईल मध्ये नेटवर्क सुद्धा दाखवत नसल्यामुळे नागरिकांना संपर्क करणे अवघड झाले आहे. कार्यालयीन कामाकरिता सुद्धा अडचण निर्माण होत असून याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share