ऍम्ब्युलन्स सायरनचा आवाज बदलणार

पुणे : गाड्यांना सध्या जे हॉर्न आहेत त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचे सांगितल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता रुग्णवाहिकेच्या सायरन संदर्भात मोठी घोषणा केली. पुण्यात आयोजित कार्यक्रमात म्हटले की, मी आता आदेश काढणार आहे की रुग्णवाहिकेवर जर्मन संगीतकाराने तयार केलेले संगीत किंवा धुन वापरण्यात यावी.रुग्णवाहिकेर आताचा कर्कश हॉर्न नको, असे त्यांनी म्हटले आहे.
गाड्यांना सध्या जे हॉर्न आहेत त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी सांगितले होते. तुमच्या गाड्यांमध्ये आता कर्कश आवाजांच्या हॉर्नपेक्षा मधूर आणि सुरेल आशा भारतीय वाद्यांमध्ये आता तुमच्या गाड्यांचे हॉर्न वाजणार आहेत आणि यासंबंधित लवकरच कायदा करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटले होते.

Share