गोंदिया जिल्हा परिषदेतील जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशक अडकला एसीबीच्या जाळ्यात
गोंदीया : ईएलओ प्रपत्राचे उर्वरित देयक काढून देण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजारांची लाच रक्कम स्किकारण्याची तयारी दर्शविल्याने जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद गोंदिया येथील जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशक मनिषकुमार सुरेंद्र पटले (३७) यांच्यावर लाप्रवि गोंदिया यांनी कारवाई केली आहे.
तक्रारदार हे रेलटोली गोंदिया येथील रहिवासी असून ते प्रिंन्टींग प्रेसचे काम करतात. तक्रारदार यांनी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद गोंदिया या कार्यालयात ईएलओ प्रपत्रांचे उर्वरित देयक ९४ हजार ४०० रूपये काढून देण्याकरिता जिल्हया व्यवस्थापक आर्थिक समावेशनक मिनषकुमार सुरेंद्र पटले यांची भेट घेतली असता तक्रारदार यांना मनिषकुमार सुरेंद्र पटले यांनी ईएलओ प्रपत्राचे उर्वरित देयक काढून देण्यासाठी ५० हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि गोंदिया येथे तक्रार दाखल केली.
लाप्रवि गोंदिया येथील तत्कालीन पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणी दरम्यान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, गोंदिया येथील जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशक मनिषकुमार सुरेंद्र पटले यांनी तक्रारदार यांचे ईएलओ प्रपत्राचे उर्वरित देयक काढून देण्याकरिता तडजोडीअंती २० हजार रूपयांची लाच रकमेची मागणी केली. त्यानुसार आज २१ सप्टेंबर रोजी मनिषकुमार सुदेंद्र पटले यांनी लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने त्यांना लाप्रवि गोंदियाच्या पथकाने जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद गोंदिया येथील कार्यालयात पकडले, त्यावरून त्यांच्याविरूध्द पोलीस स्टेशन गोंदिया येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई, लाप्रवि नागपूरच्या पोलीस अधीक्ष श्रीमती रश्मि नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक मिलींत तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक पुरूषोत्तम अहेरकर, स.हवा राजेश शेंदरे, नापोशि योगेश उईके, रंजित बिसेन, नितीन रहांगडाले, चापोहवा देवानंद मारबते यांनी केली.