मोठी बातमी : किरीट सोमय्याविरूद्ध १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल

मुंबई : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अखेर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आपल्यावरील आरोप मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा 100 कोटींचा दावा दाखल करू, अशी नोटीस अनिल परब यांनी सोमय्यांना पाठवली होती. मात्र, 72 तासानंतरही सोमय्या यांनी माफी न मागितल्याने अखरे हा दावा दाखल करण्यात आला आहे. अनिल परब यांनी ट्वीट मध्ये म्हंटले आहे की, ‘किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात मा.

उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. दरम्यान, सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यावरून अनिल परब यांनी 14 सप्टेंबर रोजी सोमय्यांविरोधात 100 कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. परब यांनी नोटीस पाठवल्यानंतर सोमय्या यांनी परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नाही, असे म्हंटले होते.

Share