ओसंडून वाहतेय वाघ नदी, अनेक गावांत अलर्ट

अतिवृष्टीमुळे काठोकाठ भरले अनेक जलाशय, वाघ नदी ओसंडून वाहू लागली

गोंदिया 13: मागील काही दिवसांपासून संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांसह नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. रविवारी गोरेगाव व गोंदिया तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात पुजारीटोला धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे धरणाचे 7 गेट 1 फुट अंतरापर्यंत उघडण्यात आले. येथील पाणी वाघ नदीमधून वैनगंगा नदीत सोडले जात आहे. अशात वाघ नदी ओसंडून वाहत असल्यामुळे प्रशासनाने नदी तटावरील गावांमध्ये अलर्ट जारी केले आहे.

ओसंडून

गोंदिया जिल्ह्यात मागील 24 तासांत म्हणजे 12 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजतापर्यंत एकूण 49.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यात गोरेगाव 67.3 मिमी व गोंदियात 76.0 मिमी पाऊस नोंद करण्यात आले. तसेच आमगाव तालुक्यात 44.4 मिमी, तिरोडा तालुक्यात 33.4 मिमी, सालेकसा तालुक्यात 63.1 मिमी, देवरी तालुक्यात 46.8 मिमी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात 24.1 मिमी व सडक-अर्जुनी तालुक्यात 33.4 मिमी पाऊस नोंद करण्यात आले. याची सरासरी 80.5 टक्के सांगण्यात आले आहे.

20 तासांत रजेगाव घाट वैनगंगा नदीत पोहचेल पाणी

या संदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पुजारीटोला धरण 97.79 टक्के भरला आहे. त्यामुळे 12 सप्टेंबरच्या रात्री 2 वाजताच्या सुमारास धरणाचे 7 गेट 1 फुट अंतरावर उघडण्यात आले आहे. त्यानंतर जलाशयाचे पाणी वाघ नदीच्या माध्यमातून आमगाव-साखरीटोला पॉइंटवर दुपारी 12 वाजता पोहचले. आता रजेगाव घाट, वैनगंगा नदीत हे पाणी पोहचण्यासाठी रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत वेळ लागू शकते.

मदतीसाठी संपर्क साधा

ओसंडून वाहणार्‍या नदीच्या धोक्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. जात कुणावरही आपत्ती आली तर तात्काळ प्रशासनाने जारी केलेल्या टोल फ्री किंवा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून मदत मागावी. यात टोल फ्री क्रमणी 1077, फोन क्रमांक 07182-230196 व मोबाइल व्हाट्सअॅप क्रमांक 9404991599 चा समावेश आहे.

Share