पाच जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेला होणार मतदान

मुंबई 13: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणूक स्थगित करण्यात आली होती. 7 जुलै 2021 रोजी होत असलेले मतदान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान स्थगित केलं होतं. मात्र, आता स्थगित करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयुक्तांनी जाहीर केला आहे.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता या निवडणुकांसाठी मतदान येत्या 5 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व ठिकाणी मतमोजणी ही 6 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं राज्य निवडणुक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी सांगितलं आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें